
मुंबईतील चेंबूर येथे मिंधे गटाच्या शाखेत दारुपार्टी रंगल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. ही दारु पार्टी सुरू असलेल्या ठिकाणी समोरच्या छत्रपती शिवाडी महाराज यांचा फोटो आहे. त्यासमोरच ही दारुपार्टी रंगली आहे. या घटनेचे व्हिडीओ व्हायरल होताच संतापाची लाट उसळली असून मिंधे गटाच्या शाखा म्हणजे दारूचे बार झाल्याची टीका होत आहे.
मुंबईतील चेंबूर येथे मिंधे गटाच्या शाखेत दारुपार्टी रंगल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे संतापाची लाट उसळली असून मिंधे गटाच्या शाखा म्हणजे दारूचे बार झाल्याची टीका होत आहे.#viralvideo pic.twitter.com/bW76EnhV0G
— Saamana Online (@SaamanaOnline) March 3, 2025
चेंबूरमध्ये मिंधे गटाच्या शाखेत झालेल्या या दारुपार्टीला शाखाप्रमुख दीपक चौहान, उपविभागप्रमुख संजय कदम यांच्यासह इतर पदाधिकारी सहभागी असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. पक्षाच्या नेत्यांच्या पोस्टर्ससमोर गटाच्या शाखेतच ही दारुपार्टी सुरू असल्याचे दिसत आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने संताप व्यक्त होत आहे.