शक्तिपीठ महामार्ग मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना पिटाळले

राज्य सरकारच्या नागपूर ते गोवा या शक्तिपीठ महामार्गाला आता बीड जिल्ह्यातूनही विरोध होऊ लागला आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई आणि परळी तालुक्यांतून शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे. या दोन तालुक्यांतील शेतकरी शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात आक्रमक झाले. आज मंगळवारी मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी पिटाळून लावले.

शक्तिपीठ महामार्गाला अनेक जिल्ह्यांतून विरोध होत असताना आता बीड जिल्ह्यातूनही शेतकऱ्यांचा विरोध होत आहे. शक्तिपीठ महामार्ग बीड जिल्हयांतून दोन तालुक्यांतून जात आहे. अंबाजोगाई आणि परळी तालुक्यांतून जाणाऱ्या महामार्गाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध बहिणीच्या नावाखाली शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला. आज शेतकरी एकत्र आले आणि आक्रमक झाले. मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला बळी पडावे लागले. शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना संतापलेल्या शेतकऱ्यांनी पिटाळून लावले. त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. या महामार्गाला एक इंचही जमीन न देण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला. संतप्त महिलांनी तर आपला संताप व्यक्त करताना लाडक्या दीड हजार रुपये देऊन आमच्या जमिनी घेणार असाल तर ते दीड हजार परत घ्या. गरज नाही आम्हाला. आमच्या लेकराबाळांनी काय खावे, सरकार जमिनीचा मोबदला म्हणून पैसे देईल. मात्र ही जमीन पुन्हा मिळणार नाही, अशा भावना महिलांनी व्यक्त केल्या.