छत्तीसगढच्या रायपूरमधील शैलेंद्र कुमार बांधे याचा शिपाई ते असिस्टंट कमिशनर असा प्रेरणादायी प्रवास आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱया तमाम विद्यार्थ्यांसाठी हा एक आदर्श आहे. शैलेंद्र कुमार बांधे व्यावसायाने मेकॅनिकल इंजिनीयर आहे. शेतकरी कुटुंबातील शैलेंद्रने इंजिनीयरिंगचे शिक्षण घेतल्यावर छत्तीसगड प्रशासनात शिपायाची नोकरी स्वीकारली. शैलेंद्र कुमार नुसतीच परीक्षा उत्तीर्ण झाला नाही तर त्याने 73वी रॅकिंग मिळवली. तर आरक्षित श्रेणीत दुसरे स्थान पटकावले. सुरुवातीला चार वेळा अपयश आले, मात्र निराश न होता प्रयत्न सुरू ठेवल्याचे सांगितले.