Shahrukh Khan- किंग खानच्या बंगल्यात राहण्याची संधी! काय करावं लागेल? वाचा सविस्तर

पडद्यावरच्या किंग खानचा बंगला तुमचं स्वागत करण्यासाठी सज्ज झालेला आहे. दस्तुरखुद्द शाहरुखच्या बंगल्यात आता तुम्हाला दिवसाचं भाडं मोजून राहण्याची संधी मिळणार आहे. हा बंगला म्हणजे मन्नत नाही बरं का.. तर हा बंगला आहे कॅलिफोर्नियातील बेव्हरली हिल्स येथे. शाहरुखचा हा आलिशान बंगला आता भाड्याने उपलब्ध आहे. हे आलिशान घर प्रसिद्ध रोडिओ ड्राइव्हपासून काही मिनिटांच्या अंतरावर आहे. यात सहा सुंदर बेडरूम आहेत. राजेशाही थाट अनुभवण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. शाहरुख खानचा हा बंगला सांता मोनिका, रोडियो ड्राइव्ह आणि वेस्ट हॉलीवूड जवळ आहे.

आर्किटेक्चरल डायजेस्टच्या अहवालानुसार, या बंगल्यात पाहुणे आलिशान सोयी सुविधांचा आनंद घेऊ शकतील. तसेच या घरामध्ये अगदी ड्रीम होमसारख्या सुविधांची रेलचेल असणार आहे. इथल्या स्विमिंग पूलसह इतर अनेक आकर्षणं या बंगल्याला चार चांद लावत आहेत. जकूझी, टेनिस कोर्ट अशा आलिशान सुविधांसह हा बंगला आता पाहुण्यांचे स्वागत करण्यास सज्ज झालेला आहे.

शाहरुखने 2019 मध्ये इंस्टाग्रामवर या घराचे फोटो शेअर केले होते, ज्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आता जे लोक मोठी रक्कम खर्च करू शकतात, त्यांच्यासाठी हा व्हिला एका रात्रीसाठी 1 लाख 96 हजार रुपयांमध्ये उपलब्ध असणार आहे. शाहरुखचा हा बंगला अदभुत असून, बंगल्यातील आतील भाग पाहून थक्क व्हायला होईल. आधुनिकता आणि जुन्याचं अनोखा मिलाफ या बंगल्यात पाहायला मिळतो. मुख्य म्हणजे बंगल्यातील भिंतीवरील पेटींग्ज आणि बंगल्यातील आरसे पाहणाऱ्याचे मन मोहून टाकतील. तसेच या बंगल्यातील भव्य फर्निचर हा येथील यूएसपी मानला जातो.

 

किंग खानची परदेशातील प्राॅपर्टी किती?
घरातील हिरवेगार टेनिस कोर्ट, आरामदायी केबिन, मोठे जकूझी आणि स्विमिंग पूल यांचा आनंद घेता येतो. शाहरुखची ही मालमत्ताच नाही तर त्याची इतर अनेक घरेही चर्चेत आहेत. मुंबईतील त्यांचा प्रसिद्ध बंगला ‘मन्नत’ अनेकदा चर्चेत असतो. हे भारतातील सर्वात महागड्या घरांपैकी एक आहे. याशिवाय, दुबईतील पाम जुमेराह येथे त्याचा एक आलिशान व्हिला देखील आहे. लंडनमधील पार्क लेनमध्ये त्यांचा एक आलिशान फ्लॅट आणि अलिबागमध्ये एक सुंदर फार्महाऊस आहे.