पाकिस्तानच्या संघातच जुंपली! शाहीन आफ्रिदीने कर्णधार बाबार आझम दिला धक्का? व्हिडीओ व्हायरल

पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम आणि वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी यांच्यात अलबेल नसल्याची चर्चा  गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. तसेच पाकिस्तानचा संघ दोन गटांमध्ये विभागला गेल्याचे पाकिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी सांगितले होते. याच दरम्यान आता शाहीन अफ्रिदी आणि बाबर आझमचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये शाहीन आफ्रिदी बाबार आझमला धक्का देताना दिसत आहे. शाहीन आफ्रिदी सामन्यात एक विकेट घेतो. त्यामुळे सर्व खेळाडू त्याच कौतुक करायला एकत्र येतात. यावेळी बाबरही शाहीनचं कौतुक करायला येतो. मात्र शाहीन त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्याला धक्का देत पुढे जातो, असे त्या व्हिडीओमध्ये दिसत आहे. मात्र हा व्हिडीओ कोणत्या सामन्यातील आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या व्हिडीओनंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे.

शाहीन आफ्रिदीवर प्रशिक्षकाशी गैरवर्तन केल्याचा आरोप

जिओ न्यूजशी बोलताना एका सूत्राने सांगितले की, “शाहीनने नुकत्याच झालेल्या दौऱ्यात प्रशिक्षक आणि व्यवस्थापनाशी गैरवर्तन केले, परंतु वेगवान गोलंदाजाच्या वाईट वर्तनावर संघ व्यवस्थापनाने कोणतीही कारवाई केली नाही.” संघातील शिस्त राखणे ही व्यवस्थापकाची जबाबदारी होती. मात्र अद्यापही कोणतीही कारवाई न झाल्याने याची सखोल चौकशी केली जात आहे.