
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट पसरली आहे. दहशतवादी हल्ल्यातील निष्पाप लोकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा, अशी मागणी सर्वजण करत आहेत. बॉलिवूडमधून या घटनेवर शोक व्यक्त करण्यात येत आहे. यावरच आता अभिनेता शाहरुख खान यानेही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर शाहरुख खान म्हणाला आहे की, “‘पहलगाममध्ये घडलेल्या अमानवी हिंसाचाराबद्दलचे दुःख आणि संताप शब्दात व्यक्त करणं शक्य नाही. अशा वेळी कोणीही फक्त देवावर विश्वास ठेवून शोकग्रस्त कुटुंबांसाठी प्रार्थना करू शकतो आणि आपल्या मनापासून संवेदना व्यक्त करू शकतो. आपण एकजूट होऊन, एक राष्ट्र म्हणून मजबूत होऊन या, घृणास्पद कृत्याविरुद्ध न्याय मिळवूया.”