अश्लील व्हिडीओ दाखवून मुलीवर लैंगिक अत्याचार

अश्लील व्हिडीओ दाखवून अल्पवयीन मुलीवर एकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना चेंबूर परिसरात घडली. या प्रकरणी टिळक नगर पोलिसांनी एकाला अटक केली. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. तक्रारदार महिला या विरार येथे राहतात. त्यांची एक 13 वर्षांची मुलगी आहे. दोन दिवसांपूर्वी ती शेजारी मिक्सर देण्यासाठी गेली होती. तेव्हा तिला एकाने जवळ बोलावले. जवळ बोलावून मोबाईलवर अश्लील व्हिडीओ दाखवले. घडल्या प्रकाराची माहिती मुलीने तिच्या आईला सांगितली. त्यानंतर मुलीच्या आईने टिळक नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.