
धार्मिक स्थळाची देखरेख करणाऱ्या 80 वर्षीय गृहस्थाने एका अल्पवयीन मुलाशी लैंगिक गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. जे जे मार्ग पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत पोलिसांनी या वृद्धाला अटक केली.
गेल्या शुक्रवारी हा प्रकार घडला. अल्पवयीन मुलगा संबंधित धार्मिक स्थळी नियमित जात होता. तेथे देखरेखीचे काम करणाऱ्या वृद्धाने त्याच्याशी लैंगिक गैरवर्तन केले. मुलाकडून हा प्रकार कळताच पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून उपनिरीक्षक सैफण कुरणे, नालंदा लोखंडे, प्रितेश शिंदे आणि जगन्नाथ काळे या पथकाने लगेच या 80 वर्षीय वृद्धाला ताब्यात घेतले.