पाळधी हिंसाचाराप्रकरणी सात जणांना अटक, सकाळी सहा वाजता कर्फ्यू हटवला जाईल; पोलिसांची माहिती

जळगावात झालेल्या हिंसाचाराप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच या प्रकरणी 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले

पोलीस अधिकारी कविता नेरकर म्हणाल्या की, काल जळगावच्या पाळधी गावात दोन गटांत वाद झाला आणि या वादात हिंसाचार झाला. या प्रकरणी 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सात जणांना अटक केली गेली आहे. पाळधी गावात सध्या कर्फ्यू लावण्यात आला आहे, सकाळी सहा वाजता हा कर्फ्यू हटवला जाईल. हिंसाचारात कुणीही जखमी झालेले नाही असेही केरकर यांनी सांगितले.