राज्यात सात अधिकाऱ्यांच्या बदल्या, वाचा यादी

राज्यात सात अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल् आहेत. त्यात मुंबईचे जिल्हाधिकारी, हाफकिनचे मॅनेजिंग डायरेक्टर यांचाही समावेश आहे.

राजेंद्र निंबाळरकर यांची बदली पुण्यात सारथीच्या मॅनेजिंग डायरेक्टर पदी झाली आहे, संजय यादव हे आधी मुंबईचे जिल्हाधिकारी होते, त्यांच्याकडे समग्र शिक्षा अभियानाची जबाबदारी देण्यात आली आहे.

राजेंद्र भारूड यांच्याकडे उच्च आणि तंत्रज्ञान शिक्षण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. दीपक मीणा राज्याच्या महसूल विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.
समीर कुरकोटी यांच्याकडे तृती आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. हाफकीनचे महेश आव्हाड यांच्याकडे महाराष्ट्र वैदयकीय वस्तू खरेदी प्राधिकरण च्या मुख्य कार्यकारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. किर्ती पुजार यांची धाराशिवच्या जिल्हाधिकारीपदी नेमणूक करण्यात आली आहे.