झारखंडमध्ये बसला अपघात, 7 जणांचा मृत्यू; 12 हून अधिक प्रवाशी जखमी

कोलकाताहून बिहारला चाललेल्या बसला झारखंडमध्ये अपघात झाला. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला तर 12 हून अधिक प्रवाशी जखमी झाले. आणखी चार ते पाच जण बसखाली दबल्याचे कळते. जखमींना उपचारासाठी बरकट्ठा आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच प्रशासनाच्या टीमने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

रस्त्यावरील दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याने चालकाचे भरधाल बसवरील नियंत्रण सुटले. यामुळे अपघाताची घटना घडल्याचे स्थानिकांनी सांगितले. अपघातानंतर घटनास्थळी एकच कल्लोळ माजला.

पोलीस आणि प्रशासकीय टीमकडून घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे. बसमधील प्रवाशांची अद्याप ओळख पटली नाही. बरकट्ठा येथे सहापदरी रस्त्याचे काम सुरू आहे. यामुळे या रस्त्यावर अपघाताच्या घटना वाढत आहेत.