दि सेतू को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या वतीने सभासदांना आता सभासदांसाठी सेफ डिपॉझिट वॉल्ट (लॉकर)ची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. 1 जानेवारीला माहीम शाखेत याचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वर्तक व संचालक मंडळ यांनी सेतूच्या आजपर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला. सेतूकडे 137 कोटी रुपये ठेवी असून शंभर कोटी रुपये कर्ज वितरित केले आहे. सेतू नेहमीच ‘अ’ वर्गात आहे. सभासदांना यावेळी दहा टक्के लाभांश देण्यात आला. ही पतसंस्था बोरिवली, वसई, पालघर, डहाणू परिसरात असून तिच्या आठ शाखा आहेत. ग्राहकांसाठी गृह कर्ज, वाहन कर्ज, तारण कर्ज, ओव्हरड्राफ्ट, वैयक्तिक कर्ज, सोने तारण कर्ज इत्यादी तसेच फिक्स डिपॉझिट, डेली डिपॉझिट, सेव्हिंग खाते इत्यादी सुविधा पुरवते.