सैफ अली खान हल्ला प्रकरण – आरोपीच्या जामीन याचिकेवर उत्तर सादर करा, सत्र न्यायालयाचे पोलिसांना आदेश

बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर प्राणघातक हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम याने जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. सत्र न्यायालयाने आज आरोपी मोहम्मदच्या याचिकेवर पोलिसांना उत्तर सादर करण्याचे आदेश देत या प्रकरणावरील सुनावणी 4 एप्रिल रोजी ठेवली.

अभिनेता सैफ अली खान याच्यावर 16 जानेवारी रोजी झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी मोहम्मद शरीफुल इस्लाम याला पोलिसांनी अटक केली. आपण कोणताही गुन्हा केला नसून आपल्याला या प्रकरणात गोवण्यात आल्याचा दावा करत मोहम्मदने जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एम. पाटील यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी न्यायालयाने पोलिसांना याचिकेवर उत्तर सादर करण्याचे आदेश देत सुनावणी 4 एप्रिलपर्यंत तहकूब केली.