स्वतंत्र वैद्यकीय कक्ष, रुग्णवाहिका; पालिकेकडून चोख व्यवस्था

मुंबईत उद्या होणाऱया मतमोजणीसाठी सर्व केंद्रांवर आवश्यक सुविधा तैनात ठेवण्यात आल्या असून या ठिकाणी स्वतंत्र वैद्यकीय कक्ष, रुग्णवाहिका उपलब्ध राहणार आहेत. मतमोजणी केंद्रावरील मतमोजणी कर्मचाऱयांसाठी मदत कक्ष तर राजकीय प्रतिनिधींसाठी चौकशी कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. तसेच जागोजागी दिशादर्शक फलक लाकून प्रकेशाबाबत माहिती देण्यात आल्याची माहिती मुंबई शहर जिह्याचे जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिली.

संजय यादव यांनी मुंबई शहर जिह्यातील मतमोजणी केंद्रांना भेट देऊन तेथील सोयीसुविधांचा आढाका घेतला. या वेळी सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱयांना भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतमोजणी प्रक्रिया पार पडण्याच्या सूचना दिल्या. मतमोजणीच्या अनुषंगाने मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी विविध कक्ष उभारण्यात आले आहेत. या कक्षाच्या ठिकाणी तसेच मतमोजणी केंद्राच्या परिसरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

  • मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी भोजन व नाश्त्याची व्यवस्था असणार आहे.
  • मतमोजणी केंद्राच्या परिसरात सुरक्षेच्या वारणास्तव अग्निशमन दलाच्या गाडय़ा ठेवण्यात आल्या आहेत.
  • माध्यम प्रतिनिधींसाठी माध्यम कक्ष तयार करण्यात आला आहे. मतमोजणी केंद्रावर वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.