शेअर बाजाराची ऐतिहासिक कामगिरी; निर्देशांकानी गाठली 80 हजारांची विक्रमी उंची

बुधवारी बाजार सत्र सुरू झाल्यानंतर शेअर बाजार निर्देशांकाने ऐतिहासिक कामगिरी करत नवा विक्रमी उच्चांक गाठला आहे. पहिल्यांदाच निर्देशांक 80 हजारांच्या पार गेला आहे. त्यामुळे बाजारात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

शेअर बाजारासोबतच निफ्टीतही आज चांगला उत्साह पाहायला मिळाला. निफ्टीने 24,292.15 चा विक्रमी उच्चांक गाठला असून सकाळी नऊच्या सुमारास निर्देशांक 498.51 अंकांनी वधारून 79,939.96 वर पोहोचला. तर निफ्टी 134.80 अंकानी वधारून 24,258.65 वर भरारी घेतली. एचडीएफसी बँकेच्या शेअरनी चांगली कामगिरी केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांच्या शेअरमध्ये 3.5 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे HDFC निफ्टी50 मध्ये अग्रस्थानी पोहोचली आहे.