दिवाळीपूर्वीच शेअर बाजारात धमाका, गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी रुपये बुडाले

आज सकाळपासून शेअर बाजार पडत होता. पण हळू हळू बाजार इतका कोसळला की गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी रुपये बुडाले. सर्वात बँक निफ्टी, स्मॉल कॅप, मिड कॅप इंडेक्सचे सर्वाधिक शेअर कोसळले आहेत. निफ्टी बँक 1100 अंकांनी तर सेन्सेक 90 अंकांनी कोसळला आहे. त्यानंतर निफ्टी 300 अंकांनी कोसळला.

मुंबई स्टॉक एक्सचेंज मधल्या लिस्टेड कंपनीती मार्केट कॅप 9.8 लाख कोटी रुपयांनी कमी होऊन 435.1 लाख कोटी वर आले. म्हणजेच एकाच दिवसात गुंतवणुकदारांचे 10 लाख कोटी रुपये कोसळले.

सकाळी सेन्सेक्स 80 हजार187 अंकांनी उघडला होता. त्यानंतर सेन्सेक्स 80 हजार 253 वर पोहोचला होता. बाजार बंद होताना सेन्सेक्स 663 अंकांनी कोसळला आणि 79 हजार 402 वर येऊन थांबला. दुसरीकजे निफ्टी 218 ने कोसळला आणि 24 हजार 180 वर येऊन थांबला. बीएसईच्या टॉप शेअर्सपैकी20 शेअर्स कोसळले तर 10 शेअर्स तेजीत होते.