मराठीतील ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना “विंदांचे गद्यरूप” या समीक्षात्मक पुस्तकासाठी 2024 चा मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार बुधवारी जाहीर झाला आहे. याबाबतची घोषणा साहित्य अकादमीने केली आहे. हजारो प्रतिभावान विद्यार्थी घडविणारे मराठी भाषेचे शिक्षक व मराठी वाङ्मयात ‘समीक्षेची प्रतिमासृष्टी’ निर्माण करणारे तपस्वी डॉ. सुधीर रसाळ यांना हा पुरस्कार जाहीर होताच साहित्य क्षेत्रातून स्वागत करत येत आहे. 91 वर्षांच्या साहित्य तपस्वीचा सन्मा झाला आहे, अशा भावना व्यक्त होत आहोत.
साहित्य क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटवलेले डॉ. सुधीर रसाळ 91 व्या वर्षातही उत्साहाने साहित्य सेवा करत आहेत. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागाचे प्रमुख तसेच प्राध्यापक म्हणून नावाजलेले आहेत. रसाळ यांच्या ‘नव्या वाटा शोधणारे कवी’ या 16 व्या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले. डॉ. सुधीर रसाळ यांना “विंदांचे गद्यरूप” या समीक्षात्मक पुस्तकातून पहिल्यांदाच विंदांच्या काव्यशास्त्राची सैद्धांतिक समीक्षा मांडलेली आहे. सुधीर रसाळ यांचा जन्म 10 ऑगस्ट 1934 रोजी वैजापुरात झाला.रसाळ कुटुंब मूळचे छत्रपती संभाजीनगरातील गांधेलीचे आहेत.