मिस नव्हे, मिस्टर म्हणा…प्रशासकीय अधिकाऱयाने नाव आणि लिंग बदलले

महसूल विभागातील एका महिला प्रशासकीय अधिकाऱयाने आपले लिंग आणि नाव बदलले असून या बदलास अर्थ मंत्रालयाने  परवानगी दिली. देशाच्या नागरी सेवेत असे पहिल्यांदा घडलेय. वरिष्ठ महसूल सेवा अधिकारी एम. अनुसूया (35) यांनी आपल्या नावात आणि लिंगात बदल केला आहे. हैदराबादमधील सीमा शुल्क आणि सेवा कर अपीलीय न्यायाधिकरणाच्या मुख्य आयुक्त  यांच्या कार्यालयात एम. अनुसूया  सहआयुक्त आहेत. त्यांनी त्यांचे नाव एम. अनुकथिर सूर्या असे केले आहे. स्त्राr लिंग बदलून पुरुष करण्यास सरकारने परवानगी दिली.