ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक आणि ‘मार्मिक’चे माजी कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत यांचे शनिवारी सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास काळाचौकी येथे राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी,जावई, दोन सुना, नातवंडे, पंतवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर भोईवाडा स्मशानभूमीत दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, आमदार मनोज जामसुतकर, माजी नगरसेवक दत्ता पोंगडे, शिवडी विधानसभा संघटक सुधीर साळवी, माजी आमदार प्रमोद जठार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेऊन आदरांजली वाहिली. त्याचबरोबर शिवसेना पदाधिकारी, कलाकार, पत्रकार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरानी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.