
बुलढाणा येथे 16 फेब्रुवारी रोजी मराठी पत्रकार परिषद संलग्नित मराठी पत्रकार परिषद बुलढाणा संघाच्या वतीने बुलढाणा जिल्ह्यातील वृत्तपत्र पत्रकारिता क्षेत्रात सेवा केलेल्या जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार बांधवांचा पत्रयोगी जीवनगौरव पुरस्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी रायपूर येथील वयोवृद्ध जेष्ठपत्रकार बबनराव देशमाने यांचा पत्रकार क्षेत्रातील योगदानाबद्दल मान्यवरांच्या उपस्थितीत सपत्नीक पत्रयोगी जीवनगौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. हा सोहळा बुलढाणा येथील गद्रे, सभागृहात 16 फेब्रुवारी रोजी पार पडला.
रायपूर येथील ज्येष्ठ पत्रकार बबनराव देशमाने व त्यांच्या पत्नी सुलोचना देशमाने यांना 16 फेब्रुवारी रोजी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पत्र योगी जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी केंद्र आणि राज्यातील मंत्री, आमदारांनी उपस्थिती लावली होती.