
क्लासजवळ उभ्या असलेल्या दोन अल्पवयीन मुलींशी वृद्धाने अश्लील वर्तन करून विनयभंग केल्याची संतापजनक घटना बोरिवली परिसरात घडली आहे. याप्रकरणी एका वृद्धाला बोरिवली पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
तक्रारदार हे बोरिवली परिसरात राहतात. त्यांची मुलगी सोमवारी तिच्या मैत्रिणीसोबत एका क्लासखाली रिक्षाची वाट पाहत उभी होती. तेथे अटक आरोपी आला. त्याने दोन्ही मुलीशी नकोसे वर्तन केले. सुरुवातीला त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर त्याने मुलीचा विनयभंग केला. याची माहिती मुलीने तिच्या वडिलांना दिली. त्यानंतर वडिलांनी बोरिवली पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी वृद्धाविरोधात गुन्हा नोंद करून त्याला अटक करून आज न्यायालयात हजर केले होते.