शेअर बाजारात भूकंप, सेन्सेक्स 1400 अंकांनी कोसळला, निफ्टीचीही घसरण

आज भारतीय शेअर बाजारात भुकंप आला आहे. सेन्सेक 1400 अंकांनी कोसळला आहे. तर निफ्टीचीही मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही 1 टक्क्यांनी कोसळला आहे.

बीएसईचा सेन्सेक्स 1434 अंकांनी कोसळला आहे. सेन्सेक्स 1.89 टक्क्यांनी कोसळला असून, सेन्सेक्स 75 हजार 641.87 अंकावर आला आहे. दुसरीकडे निफ्टीतही 367.9 अंकांनी कोसळला असून 22 हजार 976.58 अंकावर पोहोचला आहे. निफ्टी 1.63 टक्क्यांनी कोसळला असून 23 हजारच्या खाली गेला आहे. बीएसईतील लिस्टेड कंपनीतून एकाच झटक्यात 5 लाख कोटी रुपये कमी झाले आहेत.