मकर संक्रांतीत मोठ्या प्रमाणात पतंग उडवल्या जातात. दरम्यान पतंग उडविण्यासाठी लागणाऱ्या नायलॉन मांजाचा वापर न करण्याचे प्रशासनाचे आदेश आहेत. मात्र तरीही प्रशासनाचे आदेश धुडकावून नायलॉन मांजाचा वापर करणाऱ्यां 34 जणावर स्थानिक गुन्हे शाखेने तडीपार केले आहे. नायलॉन मांजा विक्रेत्यावर थेट तडीपार करण्याची ही राज्यातील पहिलीच कार्यवाही ठरली आहे.
प्लास्टीकस व इतर कृत्रिम वस्तूपासून बनविलेल्या नायलॉन मांज्याचा वापर पतंग उडविण्यासाठी केला जातो. मकर संक्रातीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पतंग उडविल्या जातात. या मांजामुळे पक्ष्यांना तसेच मानवास इजा होण्याची शक्यता असते. अश्या अनेक घटना जिल्हात घडल्या आहेत.या धाग्यावर शासनाने बंदी घातलेली असली तरी छुप्या मार्गाने याची विक्री केली जाते.चंद्रपूर जिल्हा पोलीस विभागाने पर्यायी पर्यावरण पुरक धाग्याचा वापरास प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हयात अधिसुचना जारी केली आहे. चंद्रपूर जिल्हयात पो. स्टे. स्तरावर जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. नायलॉन मांजावर प्रतिबंध घालण्यासाठी विशेष पथक पोलीस विभागाने तयार केले असून या पथकामार्फत धाडसत्र सुरु आहे.नायलान मांजा विक्री करणाऱ्या 34 इसमावर तडीपारची कार्यवाही पोलीस विभागाने केली आहे. त्यात चंद्रपूर – 19 इसम, पोलीस स्टेशन रामनगर – 08 इसम, पोलीस स्टेशन घुग्घुस- 02 इसम, पोलीस स्टेशन दुर्गापुर येथील 04 व पोलीस स्टेशन मुल येथील – 01 इसम अशा एकूण 34 इसमांना भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 मधील कलम 163 (2) अन्वये दिनांक 13 जानेवारी, 2025 ते 15 जानेवारी, 2025 पर्यंत 03 दिवसा करीता चंद्रपूर जिल्हयातुन तडिपार करण्यात आलेले आहे.