मंगळवारी पहाटे मणिपूरमधील चुराचंदपूरमधील लेसांग जवळ, अँग्लो-कुकी वॉर शताब्दी गेटजवळ कुकीसमर्थक संघटनेच्या स्वघोषित कमांडरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचे वृत्त आहे.
चुराचंदपूर जिल्ह्यातील कपरांग गावातील सेखोहाओ असे या कमांडरचे नाव आहे. तो युनायटेड कुकी नॅशनल आर्मीचा (यूकेएनए) टाऊन कमांडर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी 12.15 च्या सुमारास ही घटना घडली आणि चुरचंदपूर येथील तोरबुंग बंगल्यापासून सुमारे 1.5 किमी अंतरावर त्याचा गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली.
दरम्यान, जिल्हा पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, तो चुराचंदपूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या शवागारात पाठवण्यात आला आहे.
या गुन्ह्यामागे कोणाचा हात आहे याचा अद्याप उलगडा झालेला नाही. पोलीस घटनेचा तपास करत आहेत.
गेल्या वर्षी सुरू झालेला मैतेई आणि कुकी समाजातील जातीय हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाही. अलीकडे याचा आकडा वाढत चालला आहे. बहुसंख्य मैतेई समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळावा या मागणीला विरोध करण्यासाठी राज्यातील खोऱ्यातील जिह्यांमध्ये गेल्या वर्षी मे रोजी पहिल्यांदा हिंसाचाराला सुरुवात झाली.
तेव्हापासून, या हिंसाचारात कुकी आणि मैतेई या दोन्ही समुदायांचे 220 हून अधिक लोक आणि सुरक्षा कर्मचारी मारले गेले आहेत.