गुजरातमध्ये पुन्हा बस अपघात, रिक्षाला धडक देत सहा प्रवाशांना चिरडलं, अनेक जण जखमी

राजकोटमध्ये भरधाव बसने प्रवाशांना चिरडल्याची घटना ताजी असतानाच पाटणमध्ये गुरुवारी पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती झाली. भरधाव बसने रिक्षाला धडक देत सहा जणांना चिरडले. अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गुजरातमधील पाटण जिल्ह्यात राधनपूर महामार्गावर ही घटना घडली. भरधाव बसने एका रिक्षाला धडक दिली. यामुळे रिक्षातील सहा जण बसच्या चाकाखाली आले. अपघातात काही जण गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. सर्व मयत राधनपूरहून रिक्षाने घरी परतत होते. अपघात प्रकरणी पोलीस सखोल तपास करत आहेत.