धार्मिक आणि जातीय तेढ यावरून वादावादीचे प्रकारांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे समाजात मोठ्या प्रमाणात द्वेष पसरला आहे. या द्वेषामुळे हत्या, जाळपोळ आणि दंगलींसारख्या घटना घडत आहेत. अशीच एक घटना वाराणसीमध्ये घडली आहे. जातीवाचक शिवीगाळ करणे एका वकीलाच्या जिवावर बेतले आहे. जातीवाचक शिवीगाळ केल्यामुळे संतप्त सुरक्षा रक्षकाने वकीलावर गोळ्या झाडल्या आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
सगळीकडे नववर्षाची धामधुम सुरु होती. वाराणसीमध्येही उत्साहाचे वातावरण होते. या उत्साहाला गालबोट लावणारी घटना वाराणसीमध्ये घडली आहे. रविवारी रात्री लालपुर-पांडेयपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तडीखाना चौकाजवळील मैदानात वकील राघवेंद्र सिंह हा आपल्या मित्र आणि कर्मचाऱ्यांसोबत पार्टी करत होते. त्यावेळी सुरक्षा रक्षकांची कंपनी चालवणारा त्याचा एक मित्र गोरव सिंग पार्टीच्या निमीत्ताने तिथे आला होता. गौरव सिंगसाठी काम करणारे सुरक्षा रक्षक हरेंद्र शेखर त्रिपाठी हेदेखील तेथे उपस्थित होते.
पार्टीदरम्यान वकील राघवेंद्र सिंह यांनी सुरक्षा रक्षक हरेंद्र शेखर त्रिपाठी याला काही जातीवाचक शिवीगाळ केली. याचा राग आल्यामुळे सुरक्षा रक्षकाने आपल्या परवाना असलेल्या पिस्तुलाने वकिलावर गोळी झाडली आणि राघवेंद्र सिंह यांचा जागीच मृत्यू झाला. गोळी लागल्यानंतर राघवेंद्र सिंह यांना त्यांच्या मित्रांनी तात्काळ बीएचयूच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केले पण तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाच्या ठिकाणी धाव घेतली आणि आरोपीला बेड्या ठोकल्या. तसेच त्याने गुन्ह्यात वारलेले पिस्तूल जप्त केले आहे.