गतविजेता कार्लोस अल्काराझने डॅनिल मेदवेदेवचा 7-6 (7-1), 6-3, 6-4, 6-4 असा पराभव करत सलग दुसऱयांदा विम्बल्डनच्या अंतिम फेरीत धडक मारली. गेल्या वर्षीही अल्काराझने जोकोविचचा पराभव करत आपले पहिले विम्बल्डन जिंकले होते. तसेच याच मोसमात फ्रेंच ओपनमध्येही तोच विजेता ठरला होता. ही त्याची ग्रॅण्डस्लॅम कारकीर्दीतील चौथीच फायनल आहे. अल्काराझला गेल्या वर्षीही नोव्हाक जोकोविचला पराभव करत आपले पहिलेवहिले विम्बल्डन जेतेपद पटकावले होते. आताही तो जोकोविचविरुद्धच अंतिम युद्धात भिडणार आहे. अल्काराझ आतापर्यंत तीन ग्रॅण्डस्लॅम जिंकला असून आता चौथ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. आपल्या तीन वर्षांच्या कारकीर्दीत अल्काराझ एकही अंतिम सामना हरलेला नाही. जोकोविचने प्रथमच उपांत्य फेरी गाठणाऱया लोरेंझो मुसेटीला 6-4, 7-6 (7-2), 6-4 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. जोकोविचने 37 व्यांदा ग्रॅण्डस्लॅम फायनल गाठली असून तो 12 वेळा उपविजेता ठरला आहे.