आरंभ संगीत विद्यालय आणि संगीत शिक्षक अंजली नांदगावकर यांच्या वतीने दुसरा वर्धापन दिन सोहळा अतिशय दिमाखात साजरा झाला. वीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गाणे शिकताना शिकणाऱयापेक्षा शिकवणाऱयाची कसब आणि मेहनत अधिक लागते. संगीत शिक्षक अंजली नांदगावकर यांचे या ठिकाणी कसब लागले त्यांचे हेच खरे वैशिष्टय़ असून त्यामुळेच हा सोहळा अतिशय सुरमयी झाला. या सोहळ्यात अक्षरशः सुरांची बरसात झाली, अशा शब्दांत प्रमुख पाहुण्यांनी सोहळ्याचे आणि अंजली नांदगावकर यांचे काwतुक केले.
या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून विनायक दळवी, शिवसेना उपनेते भाऊ कोरगावकर, माजी दूरदर्शन निर्मात्या नीना राऊत, प्रसिद्ध गायक नंदेश उमप, अभिनेत्री पूर्णिमा तळवलकर, लेखक महेंद्र कदम आणि होम मिनिस्टरचे दिग्दर्शक सुभाष नकाशे, तसेच प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक मयूर वैद्य, नेपथ्यकार सुनील देवळेकर उपस्थित होते. सोहळ्याचे बहारदार सूत्रसंचालन दिपल दास यांनी केले. त्यांनी सर्व गायिकांना प्रोत्साहन दिले. रसिक श्रोत्यांनी प्रत्येक गाणे अतिशय समरसून ऐकले आणि मनापासून दाद दिली.