SEBI चा केतन पारेख यांना दिलासा नाहीच; पेमेंट डिफॉल्ट केस बंद करण्याची याचिका फेटाळली

मुंबईतील विशेष न्यायालयाने स्टॉक मार्केट ब्रोकर केतन पारेख यांची याचिका फेटाळून लावली आहे. या याचिकेत केतन पारेख यांनी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने दंड न भरल्याबद्दल सुरू केलेली केस बंद करण्याची मागणी केली होती. विशेष न्यायाधीश आर.एम. जाधव यांनी निकाल देताना सांगितले की, आरोपीने जाणूनबुजून नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसत असल्याने न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया ॲक्ट, 1992 च्या कलम 24(1) अन्वये दाखल करण्यात आलेल्या या खटल्यात पारेख आणि क्लासिक क्रेडिट लिमिटेड, पँथर फिनकॅप आणि मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेड आणि सायमंगल इन्व्हेस्ट्रेडसह अनेक सहयोगी फर्मवर आरोप करण्यात आलेले आहेत.

SEBI च्या नियम, 1995 च्या नियम 4(a) आणि (d) चे उल्लंघन केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. हे आरोप 1997 मध्ये करण्यात आलेल्या उल्लंघनाचे आहेत.