यूट्यूबर अस्मिता पटेलवर सेबीची कारवाई

सिक्योरिटी अॅण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने अस्मिता जितेंद्र पटेल नावाच्या प्रसिद्ध यूट्यूबरवर बंदी घातली आहे. अस्मिता ही यूट्यूबवर चुकीच्या पद्धतीने ट्रेडिंग टिप्स देत होती, असा तिच्यावर आरोप आहे. तिच्या चुकीच्या टिप्समुळे गुंतवणूकदारांचे 104 कोटी रुपये बुडाले आहेत. त्यामुळे सेबीने 54 कोटी रुपये जप्त केले आहेत.

सेबीच्या माहितीनुसार, अस्मिता पटेल ही ग्लोबल स्पूल ऑफ ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड प्लॅटफॉर्म चालवते. या ठिकाणी शेअर मार्पेटमधील ट्रेडिंग शिकवली जाते, परंतु तिने एज्युकेशन चॅनेलद्वारे 100 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. अस्मिताच्या यूट्यूब चॅनेलला पाच लाखांहून अधिक सब्सक्रायबर्स आहेत. तर इन्स्टाग्रामवर 2.80 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. शेअर मार्पेट शिकवण्यासाठी ती लोकांकडून 7 लाखांपर्यंत फी आकारत होती. कोर्स केल्यानंतर 30 लाख ते 3 कोटी रुपयांपर्यंत कमाई करण्याचे स्वप्न दाखवत होती.