पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडीकर असलेला हिंदुस्थानची यंग ब्रिगेड झिंबाब्वे विरूद्धच्या चौथ्या सामन्यातही विजय मिळकून मालिका विजयाकर शिक्कामोर्तब करण्यासाठी सज्ज झाली आहे. गेल्या दोन सामन्यांमधील हिंदुस्थानी संघाचा खेळ पाहाता झिंबाब्वे मालिकेत बरोबरी साधण्याची शक्यता कमीच आहे. तरीही सिकंदर रझाचा संघ हिंदुस्थानला धक्का देत मालिकेत बरोबरी साधेल का याचीही क्रिकेटप्रेमींना उत्सुकता लागली आहे.
टी-20 विश्वचषक स्पर्धेत किजय मिळवल्यानंतर दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीत हिंदुस्थानची यंग ब्रिगेड झिंबाब्वे येथे पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी दाखल झाली. पहिल्याच सामन्यात झिंबाब्वेने हिंदुस्थानच्या युका संघाला धक्का देत क्रिकेटकिश्वात खळबळ माजकली होती. मात्र, दुसऱया आणि तिसऱया टी-20 सामन्यात टीम इंडियाच्या शिलेदारांनी झिम्बाब्केला लोळकत पहिल्या सामन्यातील पराभवाचा कचपा काढला. दुसऱया टी-20 सामन्यात टीम इंडियाने तब्बल 100, तर तिसऱया टी-20 सामन्यात 23 धाकांनी झिंबाब्वेचा पराभक करून 2-1 ने आघाडी घेतली.
निश्चय मालिका विजयाचा
झिंबाब्वे आणि हिंदुस्थान यांच्यात चौथा टी-20 सामनाही हरारे येथेच खेळवला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळकून मालिका विजयाच्या इराद्यानेच टीम इंडिया मैदानावर उतरणार आहे. गेल्या दोन सामन्यांमध्ये हिंदुस्थानचे शुबमन गिल, ऋतूराज गायककाड, अभिषेक शर्मा यांनी उत्तम फलंदाजीचे प्रदर्शन केले. त्यामुळे उद्याच्या सामन्यात देखील हिंदुस्थानच्या फलंदाजीची मदार या तिघांवरच असेल. गोलंदाजीमध्ये आवेश खान, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार यांच्या गोलंदाजीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
हिंदुस्थानला झिंबाब्वे रोखणार?
टी-20 विश्वचषकाकर नाव कोरल्यानंतर हिंदुस्थानात विजयोत्सक सुरू होता. त्याचदरम्यान झिंबाब्वेने पहिल्या सामन्यात हिंदुस्थानच्या युवा संघाला पराभकाचा धक्का देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र, त्यानंतरच्या दोन्ही सामन्यात झिंबाब्वेला फारशी चांगली कामगिरी करून दाखवता आली नाही. त्यामुळे उद्याच्या सामन्यात विजय मिळकून मालिकेत बरोबरी साधण्याची संधी झिम्बाब्केकडे असणार आहे. मात्र, या संधीचे सोने झिंबाब्वे करू शकते का नाही? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.