विधानसभा निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष मतदानासाठी वापरण्यात आलेली मतदान यंत्रे तथा ‘ईव्हीएम’ एकत्रित करून ही सर्व यंत्रे भोसरी येथील राज्य वखार महामंडळाच्या गोदामात सील करण्यात आली आहेत. ‘इलेक्शन पीटिशन’च्या काळासाठी पुढील 45 दिवसांपर्यंत प्रत्यक्ष मतदानासाठी वापरलेल्या, खराब झालेल्या व राखीव ठेवलेल्या मतदान यंत्रांसह कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅटसुद्धा गोदामात स्वतंत्रपणे ठेवली आहेत. आता फेरपडताळणीसाठी यांतील काही यंत्रे पुन्हा बाहेर काढावी लागणार आहेत. मतदान यंत्रे साठवणुकीसाठी वखार महामंडळाकडून निवडणूक आयोगाने गोदाम भाडय़ाने घेतलेले आहे. गेल्या अनेक निवडणुकांमध्ये याच गोदामामध्ये मतदान झाल्यानंतरचे ईव्हीएमची साठवणूक केली जाती.
जिह्यात 21 विधानसभा मतदारसंघांसाठी 11 हजार 421 बॅलेट युनिट, तर प्रत्येकी आठ हजार 462 कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅटचे वितरण करण्यात आले होते. उच्च न्यायालयात याचिका दाखल करताना मतदान यंत्राबाबत काही तक्रार अथवा याचिका असू शकते अथवा एकूण निवडणूक प्रक्रियेबाबतच्या याचिकेत मतदान यंत्रांचा मुद्दा असल्यास कोणत्या मुद्दय़ावर मतदान यंत्राबाबत याचिका आहे, त्याबाबत उच्च न्यायालय कोणते निर्देश देते, त्यासाठी या मतपेटय़ा सील करून ठेवण्यात येतात. त्यामुळे ‘इलेक्शन पीटिशन’च्या काळासाठी या मतपेटय़ा सील करण्यात आल्या. मात्र, आता 11 उमेदवारांनी फेरपडताळणी करण्यासाठी अर्ज केल्याने त्यातील यंत्रे बाहेर काढावी लागतील. मतदानासाठी म्हणजे ‘ए’ वर्गातील यंत्रांमध्ये 11 हजार 421 बॅलेट युनिट, तर प्रत्येकी आठ हजार 462 पंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅटचा समावेश आहे.
ईव्हीएमची आंतरराष्ट्रीय तज्ञांकडून तपासणी करा
ईव्हीएमची आंतरराष्ट्रीय तज्ञांकडून तपासणी होण्याची आवश्यकता आहे. ईव्हीएमध्ये काही गुप्त कोड आहे का, हे तपासले पाहिजे. त्याशिवाय सत्य बाहेर येणार नाही, असे मत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी नोंदवले. ईव्हीएमवर ाrल शंका दूर करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असल्याचेही ते म्हणाले.
मारकडवाडीत उद्या बॅलेट पेपरने मतदान घेणार
माळशिरसमधील मारकडवाडीतील गावकरी ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. असे मतदान घेण्यास तहसीलदारांनी नकार दिल्यानंतरही गावात मंगळवारी बॅलेट पेपरवर मतदान घेतले जाणार आहे. ईव्हीएमवरील मतदानाच्या मोजणीतून जे आकडे समोर आलेत त्यावर आक्षेप घेत नव्याने मतदान घेण्याचा ठराव गावाने केला आहे.