चंद्रावर सापडली 100 मीटर लांबीची गुहा, भविष्यात मानवांसाठी ठरू शकते कायमस्वरूपी घर

 

पृथ्वीनंतर मंगळ आणि चंद्र हे शास्त्रज्ञांसाठी नेहमीच कुतुहलाचे विषय बनून राहिले आहेत. चंद्राला स्पर्श करून त्यावर अंतराळयान उतरवल्यानंतर आता तिथे लोकांना राहता येईल का, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. चंद्राबाबत अनेक रंजक गोष्टी समोर येत असतात. अशीच एक बाब नुकतीच समोर आलीय. शास्त्रज्ञांना चंद्रावर 100 मीटर लांबीच्या गुहेचा शोध लागला आहे.

चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारे नील आर्मस्ट्राँग होते. त्यांनी ज्या ठिकाणी आपले यान उतरवले त्यापासून काही दूर ही गुहा सापडली. शास्त्रज्ञांना येथे 100 मीटर लांबीची गुहा सापडली आहे. ही गुहा भविष्यात मानवांसाठी कायमस्वरूपी घर ठरू शकते, असे शास्त्रज्ञांकडून सांगितले जातंय.