
12 हजार वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या ‘डायर वुल्फ’ नावाच्या लांडग्यांच्या प्रजातीला पुन्हा जन्माला घालण्यात वैज्ञानिकांना यश आले आहे. कोलोसल बायोसायन्सेसच्या टीमने डीएनएद्वारे या प्राचीन प्राण्याला पुन्हा जिवंत केले आहे. ही लांडग्याची पिल्ले तीन ते सहा महिन्यांची आहेत. त्यांचे केस लांब असून मोठे आहेत. या लांडग्यांना शक्तिशाली स्नायू असलेले जबडे आहेत. त्यांचे वजन जवळपास 80 पौंड आहे. जे प्रौढ झाल्यावर 140 पौंडांपर्यंत पोहोचेल. शास्त्रज्ञांनी प्राचीन डीएनए, क्लोनिंग आणि जीन-एडिटिंग तंत्रांचा वापर करून तीन लांडग्याच्या पिलांना जन्माला घातले आहे. ही पिल्ले जंगलात सोडली जाणार नाहीत, पण त्यांचा अभ्यास करून संशोधकांना प्राचीन प्राण्यांबद्दल अधिक माहिती मिळू शकेल, असे जीवशास्त्रज्ञ व्हिन्सेंट लिंच म्हणाले.