इंद्रायणी नदी पुलावर स्कूल बस चालकाचे नियंत्रण सुटले, नागरिकांच्या सतर्कतेमुळे 70 मुले थोडक्यात बचावली

आळंदी येथील चऱ्होली बुद्रुक मधील रहिवासी नागरिकांची सतर्कता आणि दक्षता घेत केलेल्या उपाय योजनेमुळे 70 शालेय मुलांचा जीव वाचला. शालेय मुलांची ने आण करणाऱ्या स्कूलबसच्या चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस पुलावरून साईडच्या कठड्याना ओढत पुढे जाऊन अडकल्याची घटना गुरुवारी पावणे चारच्या सुमारास घडली. काळ आला होता मात्र वेळ आली नव्हती. सुदैवाने सर्व मुले बचावली.

चऱ्होली बुद्रुक येथील शालेय मुलांची वाहतूक करणारी लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजची स्कूल बस आळंदी – मरकळ या बाह्य वळण मार्गाने शालेय मुलांना घेऊन जात असताना हा अपघात झाला. चऱ्होली बुद्रुक येथील दाभाडे सरकार चौका पासून पुढे आल्यावर इंद्रायणी नदीवर नवीन पूल बांधलेला आहे. शालेय मुलांना बाहेर काढण्यास विष्णू गुलाब तापकीर, सुनील गावडे, सुशील निगडे, तुषार दाभाडे, संकेत तापकीर, सुरज दाभाडे, सागर दाभाडे, ओंकार भुजबळ आदींनी परिश्रम पूर्वक शालेय मुले बाहेर काढण्यास मदत केली.

या पुलावर आल्यानंतर शालेय मुलांना घेऊन जात असताना बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पुलाचे कठड्याना तोडून पुढे येऊन अडकली. सुदैवाने बस अडकल्याने मोठा अनर्थ टाळला. यावेळी स्थानिक नागरिक रहिवासी यांनी दक्षता घेत उपाय योजना केली. बसच्या काचा फोडून मुलांना तात्काळ बाहेर काढण्यात आले. या बस मध्ये 70 शालेय मुले प्रवास करीत होती. सर्व मुलांना सुखरूप बाहेर काढण्यास नागरिकांना यश आले. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. मात्र सतर्कता आणि दक्षता घेत नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत केलेली धावपळ यामुळे मुले बचावली. मोठा अनर्थ टळला. यावेळी आळंदी मरकळ कडे ये जा करणाऱ्या वाहनांसह पुढे चऱ्होली, पुणे लोहगाव कडे जाणाऱ्या गाड्यांचे रहदारीला वाहतूक कोंडी झाली. होती. माजी महापौर नितीन काळजे आणि स्कुल बस क्रेनचे सहाय्य घेत इंद्रायणी नदीवरील पुला वरून बाजूला करीत रहदारीला मार्ग मोकळा करून दिला. यावेळी नागरिकांनी दाखविलेल्या स्टार्कतेच्या कार्याचे परिसरातून कौतुक होत आहे.