भरमसाट वाढलेल्या महागाईने आधीच होरपळणाऱया सर्वसामान्यांना दिलासा मिळणे कठीण झाले आहे. त्यातच आता भारतीय स्टेट बँक (एसबीआय) ने आपल्या ग्राहकांना जोरदार झटका दिला आहे. एसबीआयने 15 नोव्हेंबरपासून कर्जाच्या व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता बँकेकडून कर्ज घेणे महाग होणार असून अनेकांचा ईएमआयसुद्धा वाढणार आहे. बँकेने लेटेस्ट मार्जिन कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट्स (एमसीएलआर) च्या व्याजदरात 5 बेसिस पॉइंट्सपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे. तीन महिन्यांच्या एमसीएलआरला 8.50 टक्क्यांवरून 8.55 टक्के केले आहे. सहा महिन्यांच्या एमसीएलआरला 8.85 टक्क्यांवरून 8.90 केले आहे. एक वर्षाच्या एमसीएलआरला 8.95 टक्क्यांवरून 9 टक्के करण्यात आले आहे. दोन वर्षांच्या एमसीएलआरचा रेट 9.05 टक्के आणि तीन वर्षांचा रेट 9.10 टक्के करण्यात आला आहे.
गृहकर्जाचा हप्ता वाढला
एसबीआयने एमसीएलआरच्या दरात बदल केल्याने आता बँकेच्या ग्राहकांना गृहकर्ज, एज्युकेशन लोन, कार लोन आणि पर्सनल लोनचा ईएमआय जास्त भरावा लागणार आहे. एमसीएलआरच्या आधारावर कर्जाचे दर अवलंबून असतात. एमसीएलआरचे दर वाढले की, कर्ज घेणाऱयांचा हप्ता वाढतो. व्याजदर हे रिझर्व्ह बँकेच्या पॉलिसी रेट रेपोच्या आधारावर ठरतात.
कॉमव्हीवाची भागीदारी
कॉमव्हीवा कंपनीने अॅमेझॉन वेब सर्व्हिसेससोबत (एडब्ल्यूएस) भागीदारी केल्याचे जाहीर केले. यावेळी कॉमव्हीवाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश चंदिरामनी आणि एडब्ल्यूएसचे व्ही. जी. सुंदर राम उपस्थित होते.
रेझ्युमे बिल्डर
नोकरी शोधणाऱया उमेदवारांसाठी प्रभावी रेझ्युमे तयार करणे अत्यावश्यक आहे. या दृष्टीने इंडीडने सादर केलेले रेझ्युमे बिल्डर हे ऑनलाइन साधन युवकांना नोकरीच्या शोधात मदत करणारे ठरत आहे, अशी माहिती इंडीडचे सेल्स हेड शशी कुमार यांनी दिली.
सात्त्विक ग्रीन एनर्जीची एमएसईडीसीएलशी पार्टनरशिप
सात्त्विक ग्रीन एनर्जी महाराष्ट्राने राज्यभरात 250 ठिकाणी सौर ऊर्जेवर चालणाऱया सबमर्सिबल पंपाचा पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (एमएसईडीसीएल) सोबत भागीदारी केली. हे पंप 3 एचपी ते 7.5 एचपीपर्यंत उपलब्ध आहेत. या वेळी सात्त्विक ग्रीन एनर्जीचे सीईओ प्रशांत माथूर उपस्थित होते. एमएसईडीसीएलसोबत भागीदारी करणे ही सात्त्विक ग्रीन एनर्जीसाठी सन्मानाची गोष्ट आहे, असे माथूर म्हणाले. 2025 पर्यंत 17.4 गीगावॅट सौर क्षमतेचा टप्पा गाठण्याचे उद्दिष्ट आहे, असेही ते म्हणाले.
करिष्माची नवी अगरबत्ती बाजारात
बंगळुरू येथील करिष्मा प्रोडक्ट्सची नवी अगरबत्ती वास्तूयंत्र आणि प्यूअर हिना मसाला अगरबत्ती बाजारात दाखल झाली आहे. ही अगरबत्ती नैसर्गिक वनस्पतीपासून तयार केली आहे. या अगरबत्तीला नैसर्गिक सुगंध आहे. ही अगरबत्ती 50 ग्रॅम, 100 ग्रॅम आणि 250 ग्रॅमच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे. कंपनीच्या अगरबत्त्या विविध प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत. बंगळुरू कंपनीचा लोगो पाहूनच अगरबत्ती खरेदी करावी. अधिक माहितीसाठी संपर्क – 9343834805.
‘जीआयसी रे’चा नफा
जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (जीआयसी रे) पुनर्विमा कंपनी यांनी आर्थिक वर्ष 2024 च्या पहिल्या सहामाहीचे निकाल जाहीर केले. जीआयसी रेचा दुसऱया तिमाहीत निव्वळ नफा 16 टक्क्यांनी वाढून 1861 कोटी रुपये झाला आहे.
सामंजस्य करार
मेडिकल टय़ुबिंगच्या उत्पादनासाठी लुब्रिझॉल आणि पॉलिहोजमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. या करारावर तामीळनाडूचे उद्योगमंत्री डॉ. टी. आर. बी. राजा आणि तामीळनाडूचे उद्योग सचिव व्ही अरुण रॉय यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱया करण्यात आल्या.
श्रीराम म्युच्युअल फंडाचा शुभारंभ
श्रीराम समूहाच्या श्रीराम असेट मॅनेजमेंट पंपनीने श्रीराम मल्टिसेक्टर रोटेशन या नवीन म्युच्युअल फंडाचा शुभारंभ केला. या वेळी श्रीराम असेट मॅनेजमेंट कंपनीचे एमडी आणि सीईओ कार्तिक एल. जैन व श्रीराम एएमसीचे वरिष्ठ फंड व्यवस्थापक दीपक रामराजू उपस्थित होते. या फंडाच्या इक्विटी पोर्टपहलिओआधारे भांडवलाची वृद्धी करणे हा उद्देश आहे.
वन वेल्थचा ‘द वेल्थ इंडेक्स’ 360 लॉन्च
वन वेल्थने क्रिसिलच्या सहकार्याने ‘द वेल्थ इंडेक्स’ अहवालाची नवीन आवृत्ती प्रसिद्ध केली. या वेळी 360 वनचे एमडी आणि सीईओ करण भगत, 360 वेल्थचे सह-संस्थापक आणि सीईओ यतीन शहा, क्रिसिल लिमिटेडचे वरिष्ठ संचालक जीजू विद्याधरन उपस्थित होते. हिंदुस्थान एक जागतिक संपत्ती केंद्र म्हणून झपाटय़ाने उदयास येत आहे.
अपोलो कॅन्सर परिषद
अपोलो कॅन्सर सेंटरच्या कॅन्सर परिषदेची सातव्या एडिशनची सांगता झाली. या वेळी अपोलो हॉस्पिटल एंटरप्राइझ लिमिटेडचे ग्रुप ऑन्कोलॉजी आणि इंटरनॅशनलचे अध्यक्ष दिनेश माधवन, इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरच्या संचालिका डॉ. एलिसाबेत वीडरपास उपस्थित होते. या परिषेदत संशोधकांसहित 2000 हून जास्त ऑन्कोलॉजिस्ट सहभागी झाले.