एसबीआयने एफडीचे व्याजदर घटवले

स्टेट बँक ऑफ इंडियाने मुदत ठेवी (एफडी) व्याज दरात 0.20 टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. त्यानुसार जर तुम्ही एसबीआयमध्ये 1 वर्षाची एफडी केलीत तर तुम्हाला 6.70 टक्के व्याज मिळेल. नवीन व्याज दर 15 एप्रिलपासून लागू होतील. आरबीआयने रेपो दरात कपात केल्यानंतर आता बँकाही एफडी व्याज दर कमी करत आहेत. याआधी अलीकडेच कॅनरा बँक आणि कोटक महिंद्रा बँकेनेही एफडीवरील व्याज दर कमी केले.