स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. यामुळे ग्राहकांना आता दर महिन्याला जादा हफ्ता भरावा लागणार आहे. एमसीएलआर 0.10 टक्के वाढवले आहे. यामुळे वाहन कर्ज, पर्सनल लोनसह अन्य कर्ज महाग होणार आहेत. 15 जुलैपासून नवे कर्जाचे दर लागू होणार आहेत. एसबीआयने 1 वर्ष, 2 वर्षे आणि सहा महिने साठी एमसीएलआरच्या दरात 0.10 टक्के वाढ केली आहे. यामुळे हा दर आता 8.75%, 8.85%, 8.95% असा असणार आहे.