सरकारी संकेतस्थळ सायबर हल्ल्यापासून रोखा, हायकोर्टाचे निर्देश; याचिका निकाली

विविध सरकारी विभागांच्या अधिकृत संकेतस्थळांवर होणारे सायबर हल्ले रोखण्यासाठी पावले उचला असे स्पष्ट करत हाय कोर्टाने यासंदर्भाची याचिका निकाली काढली.

पायाभूत सुविधांच्या अभावामुळे सरकारी वेबसाइटच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वेबसाइटच्या सुरक्षेबाबत काही भागांशी तडजोड करण्यात आल्याने सायबर हल्ले वाढले आहेत, असा दावा करत सरकारी वेबसाइट्सच्या सुरक्षेसाठी सायबर टास्क फोर्सची स्थापना करण्याबरोबरच विविध उपाययोजना राबवण्यासाठी राज्य व केंद्र सरकारला निर्देश द्यावेत अशी मागणी माहिती तंत्रज्ञान सल्लागार आणि विधी प्राध्यापक रुझबेह राजा यांनी केली आहे. याप्रकरणी अ‍ॅड. अजिंक्य उडाने व अ‍ॅड. जय भाटिया यांच्यामार्फत राजा यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर आज बुधवारी सुनावणी झाली. त्यावेळी सायबर हल्ले टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.