भिकारी पाठवू नका, सौदीने पाकिस्तानला बजावले

धार्मिक तीर्थयात्रेच्या नावाखाली देशात प्रवेश करणाऱ्या भिकाऱ्यांच्या वाढत्या संख्येबाबत सौदी अरबने चिंता व्यक्त केली. सौदी अरबचे म्हणणे आहे की, हज यात्रेच्या निमित्ताने येणारे पाकिस्तानी पुढे सौदीमध्ये भीक मागतात. मंगळवारी सौदी अरेबियाने पाकिस्तानला सांगितले की, जर परिस्थिती नियंत्रित केली नाही तर त्याचा देशातील उमराह आणि हज यात्रेकरूंवर नकारात्मक परिणाम होईल.

सौदी अरेबियाने इशारा दिल्यानंतर पाकिस्तानचे धार्मिक व्यवहार मंत्रालय ‘उमराह कायदा’ आणत आहे. या कायद्यांतर्गत धार्मिक सहलींची सुविधा देणाऱ्या ट्रॅव्हल एजन्सींचे नियमन करण्यात येईल आणि त्यांना कायदेशीर कक्षेत आणता येईल. सौदीने या प्रकरणावर चिंता व्यक्त करण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षीही पाकिस्तानला सौदी अरेबियाने हज यात्रेदरम्यान राज्यात घुसलेल्या भिकाऱ्यांच्या वाढत्या संख्येबद्दल इशारा दिला होता.