निळ्या-पांढऱया रंगाची स्लीपर सर्वांना माहीत आहे. घरात किंवा बाथरूममध्ये आपण ही स्लीपर वापरतो. अगदी शंभर रुपयांमध्ये ती मिळते. पण हीच स्लीपर लाखभर रुपयांना मिळते, असे कुणी सांगितले तर खरं वाटणार नाही आणि खरं वाटलं तरी ती ती खरेदी करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करू. सौदी अरेबियामध्ये ही हवाई स्लीपर चक्क सुमारे 4500 रियाल आहे, म्हणजेच एक लाख रुपयापेक्षा जास्त किंमतीला विकली जातेय. सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या या व्हिडियोवर नेटीजन्स भरभरून मजेशीर कमेंट्स करत आहेत.