लोकशाही वाचवा, संविधान वाचवा, महाराष्ट्र वाचवा! आज मुंबईत ‘जनसभा’

satyapal-malik

निर्धार महाराष्ट्राचा आणि भारत जोडो अभियानच्या वतीने मुंबईत शनिवार, 21 सप्टेंबर रोजी जनसभेचे आयोजन करण्यात आले आहे. नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दुपारी 3.30 वाजता ही जनसभा होणार आहे. या जनसभेत जम्मू-कश्मीर, गोवा आणि मेघालयचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

‘लोकशाही वाचवा, संविधान वाचवा आणि महाराष्ट्र वाचवा’ या शिर्षकाखाली आयोजित जनसभेत महाराष्ट्र आणि देशातील स्थितीवर मान्यवरांकडून विचारमंथन होणार आहे. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ‘हम भारत के लोग’चे अध्यक्ष तुषार गांधी, सेंट्रल कमिटी संयुक्त किसान मोर्चाचे डॉ. सुनिलम, प्रोग्रेसिव्ह रिपब्लिकन फ्रंटचे संयोजक श्याम दादा गायकवाड, भारत जोडो अभियानचे राज्य संयोजक उल्का महाजन, पुलवामा टथ मुव्हमेंटचे संयोजक फिरोज मिठीबोरवाला आपली विचार मांडणार आहेत.