![satara honey attack](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/satara-honey-attack-696x447.jpg)
साताऱ्याच्या वाई तालुक्यातील पांडवगडावर फिरण्यासाठी गेलेल्या गिर्यारोहकांना परफ्युम लावणे चांगलेच माहागात पडले आहे. परफ्युमच्या वासामुळे गिर्यारोहकांवर मधमाशांनी हल्ला केला आहे. मधमाशांच्या हल्ल्यात सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच शिवसह्याद्री बचाव पथकाने गडावर धाव घेत बचावकार्य सुरू केले. बचाव पथकाने सर्व जखमी गिर्यारोहकांना गडावरून रेस्क्यू केले आहे.
पुणे जिल्ह्यातील इंदापूरचे रहिवासी असलेले सहा गिर्यारोहक साताऱ्याच्या वाई तालुक्यातील पांडवगडावर फिरण्यासाठी गेले होते. सर्व गिर्यारोहकांनी कपड्यांवर परफ्युम लावले होते. परफ्युमच्या वासाने मधमाशा विचलीत झाल्या आणि तरुणांवर हल्ला केला.
या हल्ल्यात सहा गिर्यारोहक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोन जण बेशुद्ध असून जखमींना तातडीने वैद्यकीय मदत करण्याचे आवाहन शिवसह्याद्री बचाव पथकाचे सदस्य प्रशांत डोंगरे यांनी केले आहे.