
साताऱ्यातील औद्योगिक वसाहतीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालय लोकार्पण सोहळ्यासाठी आलेली उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर खोट्या नोटांचा पाऊस करण्यात आला होता. मात्र, या नोटा खोट्या असल्या तरी त्यावर महात्मा गांधी आणि बौद्ध स्तुपाचे चित्र असल्यामुळे त्यांचा अवमान झाल्याच्या तीव्र प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या. त्यावरून मिंधे गटावर व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालयावर टीकेची झोड उठताच त्या नोटा गोळा करून जाळून टाकण्यात आल्या.
साताऱ्यातील औद्योगिक वसाहतीत नव्याने स्थापन झालेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्रादेशिक अधिकारी कार्यालय नूतनीकरण व लोकार्पण सोहळ्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत आज साताऱ्यात आले होते. त्या कार्यक्रमावेळीच मिंधे गटाच्या कार्यकर्त्यांनी एका बाजूला सांची स्तुपाचे चित्र आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रपिता महात्मा गांधींची प्रतिमा असलेल्या दोनशे रुपयांच्या ‘चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया’ असे छापलेल्या नोटा उधळल्या. या घटनेने राष्ट्रपुरुषांचा अवमान झाल्याच्या तीव्र प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या.
या घटनेवरून टीकेची झोड उठताच प्रशासन व मिंधे गटाचे लोक कामाला लागले व त्यांनी तत्काळ या सगळ्या नोटा गोळा करून जाळल्याचे समोर आले आहे.