
सातारा जिह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली असली, तरी माण, खटावसह अन्य तालुक्यांतील काही गावांमध्ये ऐन पावसाळ्यात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जिह्यातील 155 गावांतील 51 हजार 927 नागरिकांना 21 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तरीही नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.
गतकर्षी सातारा जिह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला होता. त्यामुळे भूजल पाणीपातळीही कमालीची घटली होती. धरण, तलावांमधील पाणीपातळीही दिवसेंदिवस खालावत चालली होती. त्यामुळे जिह्यातील काही गावांमध्ये वर्षभरापासून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. कडक उन्हाळा असल्यामुळे डिसेंबरपासूनच जिह्याच्या बहुतांश भागात पाणीटंचाई जाणवू लागली. त्यामुळे टँकरची मागणी मोठय़ा प्रमाणात वाढली होती. जूनच्या पहिल्या आठवड्य़ापासूनच जिह्यात पावसाने हजेरी लावली आहे. पाण्याचे स्रोत पुनरुज्जीवित झाले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस टँकरच्या संख्येत घट होऊ लागली आहे.
माण तालुक्यातील पांगरी, मोही, डंगिरेवाडी, शेकरी, राणंद, वरकुटे म्हसवड, कारखेल, संभूखेड, हवालदारवाडी, खडकी, पळशी, पिंपरी, जाशी, भालवडी, मार्डी, पर्यंती, इंजबाव, वाकी अशी 18 गावे व 127 वाडय़ांतील 43 हजार 975 नागरिकांना 14 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. खटाव तालुक्यातील शिंदेवाडी, नवलेवाडी, गारळेवाडी यांसह 3 गावे व एका वाडीतील 2 हजार 20 नागरिक व 996 जनाकरांना 3 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
कोरेगाक तालुक्यातील होसेवाडी, भाडळे, कवडेकाडी, बोधेवाडी (भा) या 4 गावांतील 5 हजार 297 नागरिक व 4 हजार 553 जनावरांना 3 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. खंडाळा तालुक्यातील निंबोडीमधील 226 नागरिक व 351 जनावरांना एका टँकरने पाणीपुरकठा केला जात आहे. वाई तालुक्यातील आनंदपूर येथील 409 नागरिक व 185 जनाकरांना एका टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीपुरवठय़ासाठी 14 विहिरी व 3 कूपनलिका अधिग्रहित करण्यात आल्या असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत दिली.