
सरकार स्थापनेपासून सुरू झालेले महायुतीतील नाराजीनाट्य सुरुच आहे. आधी खातेवाटप, मग पालकमंत्रीपदावरुन वाद झाला. त्यानंतर आता अजित पवार आणि मिंधे गटातील स्थानिक नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. अजितदादांसमोरच महिला आमदाराने तक्रारींचा पाढा वाचत मिंधे गटावर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. मिंधे गटाचे नेते विकासकामात अडथळा आणतात, अशी तक्रार आमदार सरोज अहिरे यांनी जाहीर सभेतून केली. यामुळे महायुतीतील घुसफूस पुन्हा एकदा समोर आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवारी नाशिक दौऱ्यावर गेले होते. नाशिकच्या भगूर गावात पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा त्यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमात देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांनी महायुतीतील मित्रपक्ष विकासकामात अडथळा आणत असल्याचा आरोप केला.
सरोज अहिरे काय म्हणाल्या?
मला अनेक प्रकारचा झाला झाला असून माझ्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. आम्ही मित्रपक्षाचा धर्मा पाळतो, मात्र मित्रपक्षांच्या नेत्यांनाही शिस्त पाळायला सांगा. भगूरमध्ये काम करू नका असे मला सांगितले जाते. आजच्या कार्यक्रमात गर्दी जमू नये म्हणून चौकाचौकात गुंड उभे करण्यात आले होते, असा आरोप सरोज अहिरे यांनी केला.