सांगा मी कशी दिसते! भन्नाट आयडिया…वृत्तपत्रांपासून बनवली साडी

सोशल मीडियावर नेटिजन्सची भन्नाट क्रिएटिव्हिटी पाहावयास मिळते. अशाच पद्धतीचा एक व्हिडीओ सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. एक तरुणीने चक्क वृत्तपत्रांचा वापर करून साडी बनवली आहे. ही न्यूजपेपर साडी बघून सारेच चकित झाले आहेत. पार्वती असे या तरुणीचे नाव असून तिने चार तासांची मेहनत करून ही अनोखी साडी तयार केली. साडी बनवण्यासाठी पार्वतीने वृत्तपत्रांच्या पानांचा वापर केला.  पाने कापून, जोडून त्यांची सजावट केली. साडीची रचना बघून विश्वासच होत नाही की, ही वृत्तपत्रांपासून तयार केलेली साडी आहे. पार्वतीने स्वतः साडी नेसून फोटोशूट केले. तिच्या फोटोवर नेटिजन्स कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Art Beats (@artbeats_diary)