सारस्वत बँकेला 503 कोटींचा निव्वळ नफा

सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेला 503 कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळाला आहे. बँकेची 106वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. या बैठकीला बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर उपस्थित होते.

बँकेने 82 हजार कोटी रुपयांचा टप्पा पार केला. 31 मार्च 2024 रोजी बँकेचा एकूण व्यवसाय 82,024.77 कोटी रुपयांवर पोहोचला. यात 49,457.31 कोटी ठेवींचा आणि 32,567.46 कोटी कर्जांचा समावेश आहे. बँकेचा गेल्या वर्षीचा 351 कोटींवरून 502.99 कोटी रुपये इतका नफा झाला आहे. जो बँकेच्या 106 वर्षांच्या इतिहासात सर्वाधिक व नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राच्या इतिहासातदेखील सर्वोच्च आहे. 31 मार्च 2024 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाकरिता इक्विटी भागधारकांना 17.50 टक्के इतका लाभांश जाहीर केलेला आहे. बँकेने 125 कोटींची अतिरिक्त फ्लोटिंग निधीची तरतूद करूनही निव्वळ नफ्यात झालेली वाढ ही उल्लेखनीय आहे.