तरुणीचा डान्स पाहण्यासाठी एकच गर्दी, गॅलरी कोसळून अनेक जखमी

 

बिहारमधील सारण जिल्ह्यातील इसुआपूर जत्रेत मोठी घटना घडली आहे. येथे मंगळवारी रात्री एका ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. ऑर्केस्ट्रा पाहण्यासाठी हजारो लोकांनी गर्दी केली होती. यावेळी नागरिकांसाठी गॅलरी बनवण्यात आली होती. तेव्हा अचानक गर्दीने खचाखच भरलेली बाल्कनी जोरात कोसळली. गॅलरीत बसलेले लोक खाली उभ्या असलेल्या लोकांवर पडले. या अपघातात अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

सारण जिल्ह्यातील इसुआपूर येथील महावीर आखाड्याच्या मेळ्यात ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम सुरू होता. स्टेजवर मुली भोजपुरी गाण्यांवर नाचत होत्या. त्यांना पाहण्यासाठी हजारो लोकांनी गर्दी केली होती. खाली जागा न मिळाल्याने शेकडो लोक पत्र्याच्या शेडच्या गॅलरीत जाऊन बसले. पण मोठी गर्दी झाल्याने ती गॅलरी खाली कोसळली. यात अनेकजण जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.