Santosh Deshmukh संतोष देशमुख हत्याप्रकरणी तीन आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी तीन आरोपींची न्यायालयाने 18 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. जयराम चाटे, प्रतिक घुले, महेश केदार अशी त्या आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणातील मास्टरमाईंड सुदर्शन घुले (26), सुधीर सांगळे (23) या दोघांना शनिवारी पहाटे पुण्याच्या बालेवाडी भागातून अटक करण्यात आली आहे. सरपंचाची टीप देणाऱया सिद्धार्थ सोनवणेला कल्याणमध्ये बेडय़ा ठोकण्यात आल्या. तर आरोपींना पळून जाण्यासाठी मदत करणारा डॉ. संभाजी वायबसे याला पत्नीसह नांदेडातून ताब्यात घेण्यात आले. या सर्वांची केज न्यायालयाने 14 दिवसांसाठी सीआयडी कोठडीत रवानगी केली आहे.

संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून अतिशय निर्दयपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणी आतापर्यंत विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार यांना अटक करण्यात आली असून ते सध्या सीआयडीच्या कोठडीत आहेत.